शिर्डी (अहमदनगर) - परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्याचे पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागात शिरले आहे. साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातही पाणी घुसल्याने लिप्ट, ओपीडी, केस पेपर काउंटर हा परिसर जलमय झाला असून पाणी काढण्याचे काम संस्थानकडून केले जात आहे.
शिर्डी परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. गावातील बंधारे ओसंडून वाहत असून हे पाणी शहराच्या पश्चिम भागातील श्रीरामनगर, साईच्छानगर व आनंदनगरमधील लोकांच्या घरात शिरले आहे. या परिसरातील 60 ते 70 एकर क्षेत्रात असलेला मका, सोयाबीन शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातही पाणी शिरले असल्याने रुग्णालयाची लिप्ट, ओपीडी, केसपेपर काउंटर हा परिसरात जलमय झाला आहे. पाणी बाहेर काढण्याचे काम संस्थान कर्मचारी करत आहे.