अहमदनगर - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि परतीचा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि सोसाट्याचा वारा यामुळे दाणादाण उडवली आहे. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहेत. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
नगर दक्षिण जिल्ह्यात पावसाचा जोर; घरांसह पिकांचे नुकसान
नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहेत.
हेही वाचा -बिहार निवडणूकीसाठी मोदींचा प्रचाराचा धडाका! 12 सभा पैकी पहिली 23 तारखेला
शासनाने या नुकसानीची दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील करपडी गावातील पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसारउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. गावातील मंदिर, स्मशानभूमी, पाण्यात गेली आहेत. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्या असून, घरात पाणी शिरले आहे. पुरामुळे करपडी गावातील पूल आणि शिंपोरा बाभल गावचा ओढ्यावरील पूलही पूर्ण वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.