अहमदनगर- गोदावरी नदीच्या पुरामुळे पुणतांबा येथील कातनाल्याच्या पुलावर पाणी आल्याने शिर्डी-पुणतांबा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिर्डीकडून पुणतांबाला जाणाऱया नागरिकांना कोरपरगावमार्गे जावे लागत आहे.
गोदावरीच्या पुरामुळे शिर्डी-पुणतांबा गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल - पाऊस
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील कातनाल्याच्या पुवावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना कोपरगावमार्गे जावे लागत आहे. शिवाय गोदावरी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कातनाला नदी ही गोदावरीची उपनदी आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरीला पुर आल्याने याही नदीला पुर आला. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. परिणामी रविवारी सकाळपासून शिर्डी-पुणतांबा-पिंपळवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिर्डीकडून पुणतांबाला जाणाऱ्या नागरिकांना कोपरगाव मार्गी जावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
गोदावरी नदी काठीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन,बाजरी, मका हे पीक पाण्याआभावी जळून जात होते. मात्र शनिवारपासून शिर्डी, राहाता, पुणतांबा, सावळी आणि विहीर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.