अहमदनगर- शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली असून यामुळे नगर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. विशेष करून नगर शहरातील मध्यवर्ती भागातील चितळे रोड दिल्ली गेट भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. पाण्यामध्ये दुकानांच्या बाहेर असलेली अनेक वाहने अक्षरशः वाहत गेली.
अहमदनगर शहरात जोरदार पाऊस, वाहनेही पाण्यामध्ये वाहली
पाण्याचा प्रवाहाने आपल्या सोबत चारचाकी, दुचाकी वाहने वाहून नेली. बागरोजा हडको, यासह दिल्ली गेट आदी भागांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. महानगरपालिकेच्या वतीने आपात्कालीन यंत्रणेद्वारे याठिकाणी मदतकार्य सुरू आहे.
पाण्याच्या प्रवाहाने आपल्या सोबत चारचाकी, दुचाकी वाहने वाहून नेली. बागरोजा हडको, यासह दिल्ली गेट आदी भागांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. महानगरपालिकेच्या वतीने आपात्कालीन यंत्रणेद्वारे याठिकाणी मदतकार्य सुरू आहे. नगर शहरालगत असलेल्या सीना नदीला पूर आला आहे. शहरालगतच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. महानगरपालिकेच्या वतीने या सर्व ठिकाणी मदत यंत्रणा पोहोचविण्यात येत आहे.
हेही वाचा-पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण : कोपरगावपासून सुरू झालेला समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम