अहमदनगर - गुरुवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी-ओढ्यांना पूर आल्याने शेजारील गावे आणि वस्त्यांना याचा फटका बसला आहे. शहरात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीलाही पूर आला आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नगरकडून कल्याणकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस; सीना नदीला पूर - अहमदनगर सीना नदी पूर
नगर शहरालगत असलेला वारुळाचा मारुती, लांडे वस्ती आदी नदीलगतच्या भागातील अनेक घरात पाणी घुसल्याने येथील रहिवाशांची तारांबळ उडाली. वारुळाचा मारुती परिसरातील पुलही पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे.
नगर शहरालगत असलेला वारुळाचा मारुती, लांडे वस्ती आदी नदीलगतच्या भागातील अनेक घरात पाणी घुसल्याने येथील रहिवाशांची तारांबळ उडाली. वारुळाचा मारुती परिसरातील पूलही पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुलाची उंची वाढवावी तसेच नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा -चिंताजनक! कोरोनामुळे राज्यातील 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू, 50 लाखांचा विमा देण्याची मागणी