अहमदनगर- नगर जिल्ह्यात शनिवारी मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. या जोरदार पावसाने अहमदनगर शहराला चांगलेच झोडपून काढले. दुपारी चार आणि रात्री नऊच्या दरम्यान अशा दोन टप्यात पावसाने शहरावर आक्रमनच केले. सुसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पडणाऱया पावसाने शहराची पुरती त्रेधातिरपट उडवली.
अहमदनगर शहर जलमय! पावसाने घेतली नगरकरांची फिरकी - अहमदनगर
शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने अहमदनगर शहराला चांगलेच झोडपून काढले. दुपारी चार आणि रात्री नऊच्या दरम्यान अशा दोन टप्यात पावसाने शहरावर आक्रमनच केले
रस्त्यांची जागा वाहत्या नद्यांनी घेतली, वाहणे कागदी नावे प्रमाणे वहाऊ लागली. शालेय विद्यार्थी अडचणीत आले, दुकानांत पाणी शिरले, सखल भागात दोर टाकून लोकांना बाहेर काढावे लागले. झाडे कोलमडली, विजेचे खांब आडवी झाली. अशा अनेक घटना शहरात अनेक वर्षां नंतर घडल्या. किंबहुना अनेक प्रकारच्या कसरती या पावसाने नगरकरा कडून करून घेतल्या. मात्र, कुठेगी काही अघटित घटना या दरम्यान घडल्याचे वृत्त नव्हते.
वरूण राजाने दुष्काळी नगरकरांच्या घेतलेल्या या फिरकीला नगरकरांनीही दाद देत ही त्रेधातिरपीट एन्जॉयच केली, असे म्हणावे लागेल. महत्वाचे या दरम्यान महानगरपालिका, जिल्हा आपत्कालीन प्रशासन कुठे होते. याची मात्र चर्चा निश्चित झाली. शहरात किती पाऊस झाला याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन प्रमुखांनाही नव्हती. रविवारी सकाळी आठ वाजता ही आकडेवारी मिळेल असे तद्दन शासकीय ठोकळेबाज उत्तर पत्रकारांना मिळत होते.