महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदुरीकर महाराजांवर खटला दाखल, आज संगमनेर न्यायालयात सुनावणी

इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हे पुरावे दिले होते. मात्र, कारवाई होत नव्हती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कायदेशीर नोटीस बजावली. त्यामध्ये इंदुरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून अ‍ॅड. गवांदे यांनी दिला होता.

indurikar maharaj case  indurikar maharaj statement  indurikar maharaj case hearing  इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य  इंदुरीकर महाराज प्रकरण  इंदुरीकर महाराज वादग्रस्त प्रकरण सुनावणी
इंदुरीकर महाराज

By

Published : Jun 26, 2020, 12:35 PM IST

Updated : Jun 26, 2020, 2:42 PM IST

अहमदनगर -प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

इंदुरीकर महाराजांवर खटला दाखल, आज संगमनेर न्यायालयात सुनावणी

इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हे पुरावे दिले होते. मात्र, कारवाई होत नव्हती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कायदेशीर नोटीस बजावली. त्यामध्ये इंदुरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून अ‍ॅड. गवांदे यांनी दिला होता.

ही तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीची बैठक झाली. या बैठकीत आलेल्या तक्रारी, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे व्हीडिओ, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा विचार करण्यात आला. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीने इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदिल दिला. त्यानुसार संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी तक्रार आणि पुराव्याचे कागदपत्र संगमनेरच्या प्रथम वर्ग-एक न्यायालयात दाखल केले. त्यावर आज सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अखेर लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून तीन महिन्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

नेमके काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज? -

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते', असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटना, भुमाता ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींनी केली होती. तसेच काही जणांनी त्यांना समर्थन देखील दिले होते. तसेच समाज माध्यमांवर देखील याबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Last Updated : Jun 26, 2020, 2:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details