अहमदनगर- किर्तनकार इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्ती विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर खटला चालू आहे. यावर 3 जुलैला संगमनेरच्या न्यायालात सुनावणी होणार आहे. मात्र, महाराजांच्या समर्थकांनी महाराजांवरील केस मागे घ्या, अशी मागणी तहसील कार्यालयात निवेदने देवून केली आहे.
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' विधानाबाबत 3 जुलैला सुनावणी... - इंदोरीकर महाराज अहमदनगर बातमी
किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुत्रप्राप्तीबद्दल केलेले विधान सोशल मिडियावर व्हायरस झाले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता, असे वक्तव्य म्हणजे पीसीपीएनडिटी कायद्याचा भंग असल्याने महाराजांवर कार्यवाही करण्याची मागणी 'अनिस'ने केली होती.
किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुत्रप्राप्तीबद्दल केलेले विधान सोशल मिडियावर व्हायरस झाले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता, असे वक्तव्य म्हणजे पीसीपीएनडिटी कायद्याचा भंग असल्याने महाराजांवर कार्यवाही करण्याची मागणी 'अनिस'ने केली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने 19 जूनला संगमनेरच्या तालुका अधिकाऱ्यांनी महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर 3 जुलैला सुनावणी होणार आहे.
रंजना गवांदे यांनी महाराजांविरोधात केस केली आहे. महाराजांच्या विधानाला धर्मग्रंथाचा पुरावा आहे. त्याच बरोबर महारांजाचे कार्य चांगल आहे. महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे प्रबोधन केले आहे. महारांजवर गुन्हा हा वारकरी संप्रदायावर अघात आहे. त्यामुळे हा गुन्हा मागे नाही घेतला तर आंदोलन करू, असा इशारा अखिल वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश महाराज सोनवणे यांनी दिली आहे.
इंदोरीकर महाराजांचे प्रकरण हे न्याय प्रविष्ठ आहे. त्यावर येत्या 2 जुलैला संगमनेर येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या खटल्यात काय होते यावर सर्वांच लक्ष लागेल आहे.