अहमदनगर- जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून देशीदारूच्या ठराविक मात्रेने कोरोना झालेला रुग्ण बरा होत असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत पन्नासवर रुग्ण आपण या देशीदारूच्या काढ्याने बरे केले असेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता आरोग्य यंत्रणेने याबाबत चौकशी सुरू करताच डॉ. भिसे यांनी घुमजाव केले असून, आपण दारूने रुग्ण बरा होतो असा दावा केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणीही या पद्धतीने उपचार करू नये, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे.
काय होता डॉ अरुण भिसे यांचा व्हायरल दावा?
बोधेगाव येथील डॉ. भिसे यांनी काही दिवसांपूर्वी स्वानुभवावरून व्हाट्सऍपच्या माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली होती. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, एका साठ वर्षीय महिलेला कोरोना झाला होता, ती अत्यवस्थ होती, तीने खानेपिणे देखील सोडले होते. मात्र या महिलेला बेड मिळाला नाही. शेवटी कोणाच्या तरी सल्ल्यावरून या महिलेच्या नातेवाईंकानी महिलेला औषध म्हणून रोज 60 एमएल देशी दारूचा काढा पाजला, आणि त्याचा तिच्यावर सकारात्मक परिणाम होऊन महिला बरी झाली. ही माहिती जेव्हा डॉ. भिसे यांना कळाली तेव्हा त्यांनी गुगलवर याबाबत माहिती घेतली, मात्र आतापर्यंत कोणत्याही आरोग्य संशोधन संस्थेने अल्कोहोल हा कोरोनावर उपचार असल्याचे म्हटले नव्हते. मात्र आपण रुग्णांच्या संमतीने तीस एमएल देशीदारू सकाळ-संध्याकाळ पाण्यात देण्याचा सल्ला दिला. यात शंभर टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. दहा टक्के रुग्णांची तब्येत खालावली असताना त्यांना देखील फायदा झाला, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या पोस्टमध्ये रुग्णांनी आपल्या संमतीने हा काढा घेतल्याचे स्पष्ट केले होते. यावर संशोधन होण्याचे गरज असल्याचे देखील ते म्हटले होते, या काढ्यासोबतच आरोग्य यंत्रणेने सूचवलेले औषधे देखील आपण रुग्णांना देत होतो असंही त्यांनी सांगितले आहे.
तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाने मागितला खुलासा