अहमदनगर-नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी परिसरात मंगळवारी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. नागरिकांनी याबाबत वनखात्याला कळवले. मात्र, वनखात्याने निरीक्षण केल्यानंतर मिळालेले ठसे हे बिबट्याचे नसून तरस या वन्यप्राण्याचे असल्याचे पुढे आले आहे.
नगर शहरापासून दहा किलोमीटरवर असलेल्या पोखर्डी गाव शिवारातील ढवळे वस्तीवर मुरलीधर देठे यांना सकाळी शेतात वन्यप्राणी दिसला. त्यांना तो बिबट्या वाटला. त्यांनी तत्काळ वनविभागालाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे, तलाठी गणेश आगळे, वन कर्मचारी जगन्नाथ मुळे यांनी लगेच या परिसरास भेट दिली. त्यांनी या ठशांची पाहणी करून तो बिबट्या नसून ते तरस असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच, रात्री निर्जन भागात एकटे फिरू नये, काही दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाथर्डी-शेवगाव परिसरात बिबट्यांच्या वावर-