महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

coronavirus : 'आरोग्य विभागाला नियोजन मंडळाच्या निधीतून व्हेंटिलेटर घेण्यास मान्यता'

जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ

By

Published : Mar 21, 2020, 10:32 AM IST

अहमदनगर- कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली. यावेळी आरोग्य सुविधांसाठी आणि खासकरुन व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट सुरु झाल्यापासून यासंदर्भात दैनंदिनरित्या आपण जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या संपर्कात आहोत. तसेच संकटाचे गांभीर्य ओळखा, विनाकारण घराबाहेर पडू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, संकटाला दूर ठेवा, असे आवाहन यावेळी मुश्रीफ यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details