अहमदनगर- आज एक मे महाराष्ट्र दिन, या निमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजके वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.
अहमदनगर: महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
पालकमंत्री मुश्रीफ हे काल गुरुवारी अहमदनगरमध्ये आले होते. काल त्यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक पार पडली. आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर पालकमंत्री लगेच पुणे मार्गे कोल्हापूरकडे रवाना झाले.
पालकमंत्री मुश्रीफ हे काल गुरुवारी अहमदनगरमध्ये आले होते. काल त्यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक पार पडली. आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर पालकमंत्री लगेच पुणे मार्गे कोल्हापूरकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी कोणताही संदेश न देता तसेच औपचारिक चहापाण्याला फाटा देत ध्वजारोहण केले आणि ते पुढे रवाना झाले. ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग आदी मोजके वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरमध्ये "कोरोना ग्रामसुरक्षा समिती'' स्थापन होणार