अहमदनगर- 'इंदोरीकर महाराज चांगले कीर्तनकार असून ते लोकप्रिय आहेत. माझ्या मतदार संघात त्यांना मी दोन वेळेस घेऊन गेलो होतो. त्यांच्यावरील आरोपाचे ते उत्तर देतील मात्र, ते चांगले प्रबोधन करतात', असे म्हणत पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी इंदोरीकर महाराजांचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.
हसन मुश्रीफ म्हणतात... 'इंदोरीकर महाराज चांगले कीर्तनकार' - अहमदनगर बातमी
'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते. यावरून ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट
मुश्रीफ यांनी आज शासकीय बैठका घेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार दीर्घकाळ चालेल तसेच, विखे-पाटील सुद्धा परत येतील, असा आशावाद खासदार सुजय विखे यांच्याकडे पाहात त्यांनी केला. आपलेच सरकार येणार या भ्रमात राहिलेल्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने मोठा झटका बसल्याचेही मुश्रीफ म्हणाले.