अहमदनगर -राज्यात 105 नगर पंचायतींची निवडणूक होत असून या निमित्ताने सध्या प्रचारसभा सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, अकोले आणि शिर्डी या नगर पंचायतींचा (Nagar Panchayat Election) यात समावेश आहे. कर्जतला प्रचारसभेच्यानिमित्ताने आलेले गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Gujarat Congress President Hardik Patel) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjanay Munde) हे उपस्थित होते. यावेळेस त्यांनी विरोधात असलेल्या भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Hardik Patel in Ahmednagar : गुजराथ मॉडेल फेल झालेय - हार्दिक पटेलांची टीका
कर्जतला प्रचारसभेच्यानिमित्ताने आलेले गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Gujarat Congress President Hardik Patel) यांनी गुजराथ मॉडेल फेल (Failed Gujrat Model) गेल्याची टीका केली. यावेळेस रोहित पवार (Rohit Pawar) हे सुध्दा उपस्थित होते.
हार्दिक पटेलांची भाजपवर टीका
शुक्रवारी झालेल्या सभेत गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी आपल्या खास भाषण शैलीत भाजपवर (Hardik Patel criticize on BJP) टीका केली. 2014 पासून दिल्लीत दोन-तीन गुजराथी बसले असून देशभर गुजरात विकासाचे मॉडेलाची विकासकथा (Gujrat Development Model) सांगत आहे. मात्र, हे सर्व खोटे असून पाच हजारावर शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये आत्महत्या केल्या आहेत. तर पाच लाख युवक बेरोजगार आहेत. कुठे गेल्या दोन कोटी नोकऱ्या असा सवाल करत मोदींचे गुजरात मॉडेल फेल गेल्याचे पटेल यांनी सांगितले. गुजरातची खरी ओळख ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ पटेल आहे. आणि तीच कायम राहील असे सांगत मोदी - शहांवर निशाणा साधला.