महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hanuman Jayanti : हनुमान जयंती शिर्डीत उत्साहात साजरी, बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा तरुणांनी जिंकली

हनुमान जयंती शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत 11 तरुणांनी बाजी मारली. शक्तीचे प्रतिक असणारा 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत 50 जणांनी सहभाग घेतला. मात्र, यात फक्त 11 तरुणांना बजरंग गोटा उचलण्यात यश आले आहे.

Hanuman Jayanti
बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा तरुणांनी जिंकली

By

Published : Apr 6, 2023, 6:41 PM IST

बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा तरुणांनी जिंकली

शिर्डी : साईबाबांच्या मंदिर परिसरातील हनुमान मंदिरासमोर शक्तीचे प्रतिक असलेल्या 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत 11 तरूणांनी यशस्वीपणे ही स्पर्धा जिंकली. हनुमान जयंतीनिमित्त यंदाही क्रांती युवक मंडळाच्यावतीने श्री हनुमान जयंती उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भक्तांना प्रसादाचे वाटप :क्रांती युवक मंडळाकुन दरवर्षी शिर्डीच्या साईमंदीरा जवळील दक्षीणमुखी हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव उत्सव साजरा होत असतो. पहाटे साडेसहा वाजता हनुमानाच्या मुर्तीला गंगेच्या पाण्याने मंगलस्नान घालण्यात येते. त्यानंतर महाआरती करून भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. या निमित्त शिर्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजेन करण्यात आले होते. त्यात बजरंग गोटा या स्पर्धेचाही समावेश आहे.

बजरंग गोटा स्पर्धा :सकाळी 10 वाजता हनुमान मंदिरासमोरील शक्तीचे प्रतीक असलेला 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या सुरवातीला अविनाश गोंदकर यांच्या हस्ते बजरंग गोटा पूजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गोंदकर, सुरेंद्र महाले, विशाल कोळपकर, योगेश गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.

11 तरुणांनी स्पर्धा जिंकली : बजरंग गोटा या स्पर्धे तरुणांनी मोठ्या जोशात सहभाग नोंदवला. तसेच जय श्रीराम, हनुमानाचा जयजयकार करत 50 तरुणांनी हा गोटा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यात एकूण 11 तरुणांनी हा 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलला. यामध्ये मनोज मयुर, सुरेश सुपेकर, सुरज रोकडे, सुदर्शन वेर्णेकर, राजू पांचाळ, मॉन्टी ठाकूर, सागर परदेशी, हर्षल अभंग, तसेच हिमाचल प्रदेशचे साईभक्त ठाकूर, गुजरातचे गांधी यांनी देखील सहभाग घेतला होता. शेवटी सचिन तांबे यांनी गोटा उचलून स्पर्धेचा समारोप केला.

बजरंगबलीची विशेष पूजा :आज हनुमान जयंती आहे. हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता. या दिवशी बजरंगबलीची विशेष पूजा केल्याने समस्या तर दूर होतात असे भाविकांचे म्हणणे आहे. रामभक्त हनुमानाजींच्या महिमा अमर्याद आहेत. त्याच्या शक्तीचे मोजमाप कशातही करता येत नाही. दु:ख, संकटाच्या वेळी महाबली हनुमानाचे ध्यान केल्याने सर्व समस्या दूर होतात अशी धारणा आहे. हनुमान जयंतीला हनुमानजींची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांच्या पूजनाने जीवनातील समस्या दूर होतात.

हेही वाचा - Tadoba Gambling News : ताडोबात जुगार खेळताना वन अधिकाऱ्याच्या चालकासह दोन कर्मचाऱ्यांना अटक; दुर्गापूर पोलिसांची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details