शिर्डी :भारतात गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आषाढी पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. साईबाबा हयात असल्यापासून शिर्डीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामुळे आजही या दिवसाला अनन्यसाधारण वैश्विक महत्त्व आहे. साईबाबांवर श्रद्धा असलेले भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येतात आणि समाधीचे दर्शन घेतात.
असे आहे नियोजन :शिर्डीतयावर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार 02 जुलै रोजी सकाळी 05.15 श्रीची काकड आरती, 05.45 वाजता श्रींचे फोटो पोथीची मिरवणुक काढण्यात येणार आहे. ६.०० वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, दर्शन, सकाळी 07.00 वाजता श्रींची पाद्यपूजा करण्यात येणार असल्याची माहिती पी. शिवा शंकर यांनी दिली आहे. दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प. डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर,आंबेगाव बु. (पुणे) यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी 07.00 वा. श्रींची धुपारती, रात्री 7.30 ते 9.00 आणि रात्री 9.30 ते रात्री 10.00 पर्यंत सुनिता टिकारे, मुंबई यांचा भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कलाकारांचा साईभजन कार्यक्रम :उत्सवाच्या मुख्य दिवशी, सोमवार, 03 जुलै रोजी सकाळी 05.15 वाजता, श्रींची काकड आरती, 05.45 वाजता अखंड पारायण, श्रींच्या फोटोची मिरवणूक, 06.20 ला .श्रींचे मंगलस्नान, दर्शन, सकाळी 7.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.13 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प. डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर, आंबेगाव बु. (पुणे) यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी 07.00 वाजता श्रींची धुपारती होईल. विनिता बजाज, दुर्गा साई मंडळ, नवी दिल्ली यांचा भजन संध्याकाळचा कार्यक्रम सायंकाळी 7.30 ते 9.00 आणि रात्री 9.30 ते 10.00, श्रींची रथ मिरवणूक गावातून निघेल. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. या दिवशी श्रींचा परिसर आणि 04 जुलै रोजी पहाटे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्री 10.00 ते 05.00 या वेळेत मंदिराशेजारील रंगमंचावर इच्छुक कलाकारांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे.