महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सव रद्द; साईबाबा मंदिरात भाविकांना प्रवेश बंद

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना आणि विविध ठिकाणांहून येणाऱ्या पालख्यांना प्रशासनातर्फे पास देण्यात येणार नाही. उपरेाक्त कालावधीत भाविकांनी शिर्डी येथे येऊ नये, असे आवाहन जिल्हा व तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

shirdi saibaba temple (file photo)
शिर्डी साईबाबा मंदिर (संग्रहित)

By

Published : Jul 4, 2020, 11:10 AM IST

Updated : Jul 4, 2020, 11:43 AM IST

शिर्डी (अहमदनगर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवरगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील साईबाबा मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच गुरुपौर्णिमा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना आणि विविध ठिकाणांहून येणाऱ्या पालख्यांना प्रशासनातर्फे पास देण्यात येणार नाही. उपरेाक्त कालावधीत भाविकांनी शिर्डी येथे येऊ नये, असे आवाहन जिल्हा व तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. सदर आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबधितांविरुध्द साथरोग अधिनियम 1897 चे कलम 188, भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार; आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

Last Updated : Jul 4, 2020, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details