अहमदनगर - शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी भाविकांविना हा उत्सव साजरा करण्यात आलाय. कोरोनामुळे अद्याप मंदिर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे या उत्सवासाठी देखील ठराविक विश्वस्त आणि पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.
शिर्डी साई मंदिर : यंदाची गुरुपौर्णिमा भक्तांविना साजरी - sai temple news
शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी भाविकांविना हा उत्सव साजरा करण्यात आलाय.
शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली.
गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांगता दिवस असल्याने आज साईमंदिरात काल्याचे किर्तन पार पडले. त्यानंतर दहीहंडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली आणि उत्सव समाप्त झाला.