अहमदनगर - रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते का, यावर विवाद असताना राज्यपाल पदावरील जबाबदार व्यक्तीने केलेले वक्तव्य करायला नको होते. ( Governor's Statement on Chhatrapati Shivaji Maharaj ) तसेच याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. ( Hasan Mushrif on Governor's Statement regarding Chhatrapati Shivaji Maharaj )अहमदनगर इथे कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Minister Hasan Mushrif Corona Review Meeting Ahmednagar ) रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. सद्गुरू भेटले नसते तर शिवाजी महाराजांचे महत्त्व काय असते या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोशारी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावर मुश्रीफ यांनी हे मत व्यक्त केले.
जिल्हा रुग्णालय जळीतकांड अहवाल -
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला नोव्हेंबर महिन्यात लागलेल्या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याबाबतचा विभागीय आयुक्त यांचा अहवाल आरोग्य मंत्री आणि पोलिसांकडे आला आहे. तो जनतेसाठी खुला करावा यासाठी आपण राजेश टोपे यांना विनंती करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन घेतला असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच जामिनावर मुक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.