महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद ! गोमातेच्या प्रेमापोटी भीषण दुष्काळातही शेतकऱ्यांच्या गायी सांभाळत आहेत गोळवा बंधू - संगमनेर

घारगाव येथील शांतीलाल आणि धनंजय गोळवा या बंधूनी गोमातेच्या प्रेमापोटी अनेक शेतकऱयांकडून गावरान गायी आणल्या आहेत. दोघेही चांगल्या पद्धतीने गायींचे संगोपन करत आहेत.

गायींची संगोपन

By

Published : May 16, 2019, 10:15 PM IST

अहमदनगर- संगमनेर तालुक्याच्या पठार भागात यावर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी राहिले नाही. अनेक शेतकऱयांनी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकली आहेत. पण, अशा कठीण परिस्थितीतही घारगाव येथील शांतीलाल आणि धनंजय गोळवा या बंधूनी गोमातेच्या प्रेमापोटी अनेक शेतकऱयांकडून गावरान गायी आणल्या आहेत. दोघेही चांगल्या पद्धतीने गायींचे संगोपन करत आहेत.

धनंजय गोळवा यांनी सांगितले, की आज सगळीकडे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा व पाण्याअभावी गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही या गावरान गायांना आधार देण्याचे ठरवले आहे. या गावरान गायींचे शेण व गोमुत्राचा मोठा फायदा शेतीसाठी होणार आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस भीषण दुष्काळाची दाहकता वाढत चालल्याने शासनाने पठार भागात एखादी तरी चारा छावणी सुरू करावी.

गोळवा बंधूंची शेती शेळकेवाडी परिसरात आहे. त्यांच्याकडे चारा उपलब्ध असल्याने त्यांनी भीषण दुष्काळात पठार भागातील ज्या गावरान गायींचे चारा व पाण्याअभावी हाल होत आहेत. अशा गावरान गायी घेण्याचे ठरवले. भीषण दुष्काळात जनावरांचे चाऱयाअभावी मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी गोळवा यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांनी गावरान गायी घेवून जा, असेही सांगितले. मग गोळवा यांनीही शेतकऱ्यांच्या घरी जावून गावरान गायी आणण्यास सुरुवात केली. आता गोळवा यांच्याकडे सध्या १२ गायी आहेत.

भीषण दुष्काळी परिस्थितीत आपल्याला एक गाय सांभाळणे सुद्धा अवघड आहे. पण तरीही केवळ कठीण परिस्थितीत व गोमातेच्या प्रेमापोटी गोळवा बंधूंनी पठार भागातील गावांमध्ये जावून शेतकऱयांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर शेतकऱयांनी गोळवा यांना गावरान गायी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या सर्व गायी आणून घरासमोर असणाऱया चिंचेच्या झाडाखाली त्यांचा निवारा केला आहे. दररोज या गायांना ओला आणि वाळलेला चारा दिला जातो. या सर्व गावरान गायांची गोळवा बंधू अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details