अहमदनगर- जिल्ह्यासह वाशी, नवी मुंबई, मालेगाव आदी परिसरात पोलीस असल्याचे भासवून महिलांकडून सोने लुबाडणाऱ्या तसेच धूम स्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या एका टोळीला जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
धुम स्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीतील ४ जणांना श्रीरामपुरात अटक - dhum style
धुम स्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीतील ४ जणांना श्रीरामपुरात अटक करण्यात आली आहे. अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
आझाद अली युसुफ सय्यद उर्फ इराणी, आयुब उर्फ भुऱ्या फय्याज उर्फ इराणी, अली राजा उर्फ अलीबाबा शब्बीर बेग उर्फ इराणी, अकबर शेरखान पठाण असे अटक केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. नगरच्या श्रीरामपूरातील इराणी मोहल्ला येथे हे आरोपी वास्तव्यास होते. नगर जिल्ह्यासह मालेगाव, नवी मुंबई, वाशी या ठिकाणी या टोळीतील आरोपींनी पोलीस असल्याचे भासवत सोने लुबाडण्याचे प्रकार केल्याची कबुली दिली आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, मन्सूर सय्यद, सोन्याबापु नाणेकर, रवींद्र कर्डिले, संभाजी कोतकर, बाळासाहेब मुळीक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.