शिर्डी (अहमदनगर) -शिर्डीच्या साईचरणी भक्त ( gold flute donated to sai baba temple shirdi ) आपल्या कुवतीप्रमाणे आणि श्रद्धेनुसार मुल्यवान दान करत असतात. साईबाबांनी शिर्डीतील मशिदीत राहून सर्वधर्म समभावाची शिकवण देत मशिदीला द्वाराकामाई म्हटले. त्यामुळे, अनेक भक्त साईबाबांना श्रीकृष्णाच्या ( Gold flute Shirdi ) रुपातही बघतात. याच शिर्डीतील द्वारकाधीशाला दिल्लीचे ऋषभ लोहिया यांनी सुमारे 4 लाख 85 हजार 757 किंमत असलेली 100 ग्राम वजन असलेली सोन्याची ( gold flute to sai baba ) बासरी अर्पण केली आहे.
हेही वाचा -Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईंची 'बीज राखी'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांंसाठी बनवली खास राखी
साई चरणी 33 लाखांचे सुवर्ण मुकुट अर्पण -गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे शिर्डीत भाविकांना येता आले नाही. तसेच साई चरणी येणाऱ्या दानाचा ओघही थांबला होता. मात्र, आता कोविडचे संकट दूर होवून निर्बंध उठल्याने शिर्डीला भाविकांची रिघ लागलेली दिसते. साई चरणी भाविकही आता सोने, चांदी, रोख रक्कम आणि वस्तू स्वरुपात भरभरून दान करू लागले आहेत. गेल्याच महिन्यात आपल्या पत्नीची अंतीम इच्छा म्हणून साई चरणी हैद्राबाद येथील भाविकाने 33 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण केला होता.