शिर्डी -संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील पशुपालकाने आपल्या बैलाचा दशक्रियाविधी ( Dasakriya Ritual Bull ) संपन्न केला. शिवाय त्याचे स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला देणगीसह वृक्षारोपण करून आयुष्यभर केलेले कष्टाबद्दल अनोखी श्रद्धांजली ( Tribute ) वाहिली. पशुपालकाच्या अनोख्या प्रेमाबद्दल सर्वांनी यांचे कौतुक केले. सावरगावतळ येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पांडुरंग नेहे ( Progressive farmer Balasaheb Pandurang Nehe ) यांच्याकडे "पिंट्या, सुरत्या" नावाची बैलजोडी होती. ह्यातील पिंट्या या बैलाचे दहा दिवसापूर्वी अचानक दुःखद निधन झाले होते. सत्तावीस वर्ष या पिंट्या -सुरत्या नावाच्या बैलजोडीच्या सहाय्याने बाळासाहेब यांनी शेतीत प्रचंड काबाडकष्ट करत नंदनवन फुलविले. पिंट्या - सुरत्या बैलजोडीपासून बाळासाहेब यांचा गोठा गोकुळावाणी फुलला आहे. आर्थिक संपन्नता आल्याने त्यांचे जीवन सुखकारक झाले आहे. बाळासाहेबांचे आपल्या या पिंट्या- सुरत्या बैलजोडीवर मुलांप्रमाणे अतोनात प्रेम होते.
हेही वाचा -Har Ghar Tiranga : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ