महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : अबब...! बुलेटच्या किंमतीत मिळाली 'शेळी' - one and half lakh price goat

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक असा शेळी पालन व्यवसाय आहे. त्यांची एक शेळी 9 फेब्रुवारीला फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी भेंडा येथे येऊन तब्बल 1 लाख 51 हजार रुपये मोजत ही बोर जातीच्या शेळी खरेदी केली आहेे.

goat-got-more-than-one-and-half-lakh-price-in-ahmednagar
बुलेटच्या किंमतीत मिळाली 'शेळी'

By

Published : Feb 10, 2021, 5:05 PM IST

Updated : Feb 10, 2021, 9:49 PM IST

अहमदनगर -तुम्ही म्हैस, बोकड, 3 लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या बोर जातीच्या शेळीला चक्क 1 लाख 51 हजार रुपये किंमत मिळाली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट पाहा.

शेतकरी संदीप मिसाळ यांची प्रतिक्रिया.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक असा शेळी पालन व्यवसाय आहे. त्यांची एक शेळी 9 फेब्रुवारीला फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी भेंडा येथे येऊन तब्बल 1 लाख 51 हजार रुपये मोजत ही बोर जातीच्या शेळी खरेदी केली आहेे.

काय विशेषत: -

या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचा गर्भ देशी शेळीच्या गर्भाशयात ठेवून त्यापासून ही जात वाढविण्यात आलेली आहे. या पासून होणारे बोकड-शेळी मध्ये जास्त रोग प्रतिकार शक्ती, हाडांची साईज मोठी होते. दर दिवसाला 200 ते 250 ग्राम वजन वाढत जाऊन 3 महिन्यात 25 ते 30 किलो वजन होते, अशी ही जात असुन या शेळीचा उपयोग खास करून मास खाण्यासाठी लोक वापर करत असल्याची माहिती संदीप मिसाळ यांनी दिली आहे.

आज विक्री केलेली शेळी 2 वर्षे वयाची असून 70 किलो वजन आहे. सध्या ती गर्भवती असून तिचे हे तिसरे वेत आहे. एका वेळी 2 ते 3 पिल्लांना जन्म देते. किमान 2 पिल्ले तर नक्की होतील आणि ते दोन-अडीच लाखाला विकले जातील, म्हणून तिला इतकी किंमत मोजली आहे.

हेही वाचा -कृषी सुधारणांवर शरद पवारांनी घेतला यू टर्न - नरेंद्र मोदी

40 हजार रुपयाला खरेदी केला होता बोकड -

भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप परशराम मिसाळ यांचा शेती व्यवसाय आहेत. मात्र, शेतीतून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने मिसाळ यांनी गेल्या पाच वर्षा पूर्वी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. सुरवातीला संगमनेरी, उस्मानाबादी, जातीच्या शेळ्या मिसाळ यांनी खरेदी करून शेळी पालन व्यवसाय सुरू केला. मात्र, यातुन जास्त उत्पन्न मिळत नसल्याने मिसाळ यांनी फलटण येथील निमकर सीडला भेट दिली. त्यावेळी त्यांनी एक आफ्रिकन बोर जातीचा बोकड 40 हजार रुपयांना खरेदी केला आणि या ओरिजिनल आफ्रिकन बोर जातीच्या नरापासून (बोकडापासून) आपल्याकडे असलेल्या संगमनेरी, उस्मानाबादी जातीच्या (मादी) शेळ्यांना 100 टक्के ब्रिडिंग करण्यास सुरुवात केले आहे.

आजमितीला ब्रिडिंगच्या 10 ते 12 मादी आणि ब्रिडिंगच्या 3 शेळ्या मिसाळ यांच्या गोठ्यात आहेत. यातील आफ्रिकन बोर जातीची एक शेळीची आज विक्री झाली. फलटण येथील मल्हार गोट फार्मचे मालक तेजस भोईटे यांनी आज भेंडा येथे येऊन 1 लाख 51 हजार रुपयांना शेळी खरेदी केली आहे.

भेंडा बुद्रुक येथील संदीप परशराम मिसाळ या शेळी पालन करणाऱ्या व्यावसायिकाच्या गोठ्यातील शेळी तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांना विक्री झाल्याची माहिती वेगाने जिल्ह्यात पसरली. यानंतर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आज सकाळपासुन मिसाळ यांच्या गोठ्यावर मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे. तर शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिसाळ आफ्रिकन बोर जातीची शेळी पालन करण्यावर जास्त भर देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले आहे.

यामुळे मिळते इतकी किंमत -

तर सध्या तरी मार्केटला आफ्रिकन बोर जातीच्या बोकड आणि शेळीला मागणी कमी आहे. मात्र, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याचंही यावेळी मिसाळ म्हणाले आहे. ओरिजिनल आफ्रिकन बोर जातीच्या बोकडापासून 100 टक्के ब्रिडिंग केलेली ही शेळी आहे. ओरिजिनल बोकड किंमत 11 ते 12 लाख रूपयांचे पुढे आहे. त्यामुळेच या शेळ्यांना इतकी किंमत मिळते.

Last Updated : Feb 10, 2021, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details