ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर: आफ्रिकन शेळीला मिळाली तब्बल दीड लाख रुपये किंमत! - नेवासा शेळी विक्री न्यूज

आफ्रिकन शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे या शेळीचे दिवसाला 300 ते 350 ग्रॅमने वजन वाढते. शेळींच्या पिल्लांची वजन वाढ दिवसाला 400 ते 450 ग्रॅम वाढते.

आफ्रिकन शेळी
आफ्रिकन शेळी
author img

By

Published : Feb 9, 2021, 10:29 PM IST

Updated : Feb 9, 2021, 10:58 PM IST

अहमदनगर- तुम्ही म्हैस ३ लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र, नेवासामधील एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या बोर जातीच्या शेळीला चक्क 1 लाख 51 हजार रुपये किंमत मिळाली आहे.


नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक असा शेळी पालन व्यवसाय आहे. त्यांची एक शेळी 9 फेब्रुवारीला फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी भेंडा येथे येऊन खरेदी केली. या एका शेळीसाठी त्यांनी चक्क 1 लाख 51 हजार रुपये मोजले आहेत.

आफ्रिकन शेळीला मिळाली तब्बल दीड लाख रुपये किंमत


हेही वाचा-'जालना लोकसभेत रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'


आफ्रिकन शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे या शेळीचे दिवसाला 300 ते 350 ग्रॅमने वजन वाढते. ही शेळी तिसऱ्या वेताला आहे. या शेळींच्या पिल्लांची वजन वाढ दिवसाला 400 ते 450 ग्रॅम वाढते. या शेळीला दिवसाला 1 किलो खाद्य लागते. यामुळे दररोज 30 ते 35 रुपये खर्च येतो. तर 2 लाख रुपये उत्पन्न मिळते, असे शेतकरी संदीप मिसाळ यांनी सांगितले.

फेटे घालून आनंद व्यक्त

हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट; राज्यात आढळले नवीन 2, 515 रुग्ण

फटाके फोडून आनंद व्यक्त-
संदिप मिसाळ यांच्याकडे 15 आफ्रिकन जातीच्या शेळ्या आहेत. ते प्रत्येक वर्षाकाठी सुमारे 15 ते 16 लाख रुपये कमावितात. 2016 पासुन त्यांनी हा समृद्धी बोअर गोट फॉर्म चालू केला आहे. ही आफ्रिकन गोट शेळी 1 लाख 51 हजार रुपयांना विकल्यामुळे समृद्धी बोअर गोट फॉर्मचे मालक संदीप मिसाळ यांनी फेटा बांधून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी उद्योजक बापुसाहेब नजन, श्रीधर मिसाळ, बाळासाहेब मिसाळ, डॉ. ढवाण, राजेंद्र तागड व पिंटू वाघडकर तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Feb 9, 2021, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details