महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे - कन्हैया कुमारचा ऑनलाइन संवाद - kanhaiya kumar news

भारताला सत्य अहिंसेची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधींनी या तत्त्वातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येकाला घटनेने समानतेचा अधिकार दिला. लोकशाहीमुळे देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली असून सध्या काही शक्ती मोडून त्या ठिकाणी हुकूमशाही लादू पाहत आहेत, असे कन्हैय्या कुमारने म्हटले

balasaheb thorat in ahmednagar
लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे - कन्हैया कुमारचा ऑनलाइन संवाद

By

Published : Oct 7, 2020, 7:41 AM IST

अहमदनगर - भारत हा विविध संस्कृती, जात, धर्म, वेष, भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी लोकशाही ने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचवण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे असे आवाहन कम्युनिट पार्टीचा तरुण नेते कन्हैया कुमार यांनी केले आहे. संगमनेर येथील जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित लोकशाही या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, इंग्लंडमधून कार्लस टोर्नर,कायदे तज्ज्ञ अ‍ॅड.असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरीकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदींनी सहभाग घेतला. यावेळी संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या द्रोनागिरीतील मुख्य व्यासपीठावर जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.

भारताला सत्य अहिंसेची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधींनी या तत्त्वातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येकाला घटनेने समानतेचा अधिकार दिला. लोकशाहीमुळे देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली असून सध्या काही शक्ती मोडून त्या ठिकाणी हुकूमशाही लादू पाहत आहेत. लोकशाहीचे स्तंभ केंद्रीय सत्तेचा मर्जीनुसार काम करत आहेत. हे चिंताजनक आहे. प्रशासन घटनेला बांधिल असले पाहिजे. मात्र ते सत्ताधार्‍यांची मनधरणी करत आहेत. माध्यमे फक्त टीआरपीच्या मागे धावत आहेत. त्यामुळे माध्यमांवरील विश्वास शंकास्पद ठरला आहे. देशांमध्ये हाथरसची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तेथे लोकशाहीची सर्व मुल्ये पायदळी तुडवली गेली. गोरगरिबांना आपल्या व्यथा मांडता येत नाहीत. अशा परिस्थितीत विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे. मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात लोकशाही वाढली पाहिजे. गल्ली ते संसदेपर्यंत लोकशाहीची मूल्ये आपण प्रत्येकाने जगली तरच यापुढील काळामध्ये लोकशाही समृद्ध ठेवू शकतो, असे कन्हैय्या कुमारने सांगितले.

जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्समुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरोगामी विचार व भारतीय संस्कृतीचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विचार घेऊन मागील 20 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात जयहिंद लोक चळवळ काम करत आहे. राज्यघटनेवर विश्वास असणार्‍या या पुरोगामी विचारांच्या चळवळीने सुसंस्कृत तरुण उभे केले आहे. त्यांच्या माध्यमातून सदृढ समाज निर्मितीसाठी काम सुरू आहे. मात्र सध्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे यात अत्यंत चिंताजनक असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

समता व बंधुता हा लोकशाहीचा पाया आहे. मात्र सध्या देशामध्ये समतेच्या तत्वाला सुरुंग लावला जात आहे. अनेक राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. विरोधकांचा आवाज बंद केला जात आहे. उथळ प्रसिद्धीला महत्त्व दिले जात असून माध्यमांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह आहेत. देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात असमर्थ ठरलेल्या मध्यवर्ती सरकारने जातीयतेला प्राधान्य दिल्याची टीका त्यांनी केली. इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, अ‍ॅड.असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली,अमेरीकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदींनी सहभाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details