रोहित दादांना उमेदवारी द्या ; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे - CONSTITUNCY
रोहित पवार सध्या मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे सांगत बारामती अॅग्रो मार्फत ८० च्या वर पाण्याचे टँकर सुरू केल्याचे तसेच भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगितले. तसेच पाण्यासाठी जामखेडमध्ये झालेल्या वादावादी झालेल्या प्रभागात दोन अतिरिक्त टँकरची सुविधा रोहित पवार यांनी केल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले.
रोहित पवार
अहमदनगर- रोहित दादांना उमेदवारी द्या; ते १०० टक्के निवडून येतील, असे साकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे घातले आहे. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असताना कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांनी शरद पवारांना थांबण्याची विनंती केली असता, त्यांनी वेळ देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार हे देखील उपस्थित होते.