शिर्डी ( अहमदनगर ) - सध्या दूध दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात उन्हाळ्यामुळे व अर्थव्यवस्थेतील शेतकरी विरोधी धोरणामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊन व नैसर्गिक वातावरणाचा परिणाम म्हणून दुधाचे उत्पादनही घटले आहे. अशा पार्श्वभूमीवर गायीच्या दुधाला किमान 42 रुपये दर शेतकर्यांना द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे. दुग्धविकास मंत्री दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचाही आराेपही त्यांनी यावेळी केला.
दूध पावडरची दरवाढ -कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर ( Rates of Milk Powder ) कोसळून 180 रुपये प्रति किलोपर्यंत खाली गेले. कोविड साथीचा काही प्रमाणात प्रतिबंध झाल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाचे उत्पादन समिती झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर आता 300 रुपये प्रति किलोपर्यंत वधारले आहेत. देशांतर्गत बाजारातही दूध पावडरला प्रति किलोस 325 रुपये दर मिळत आहे.