महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tragic Deaths... हातावर मेहंदी लागण्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन - कोरोनामुळे तरुणीचा मृत्यू

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उप प्राचार्य,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे काल कोरोनाचे उपचार घेत असतांना निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही करोना विरूद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय -लेकींच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

girl dies by covid after 10 day of her mother death in akole Ahmednagar
सुकृता आणि तिची आई

By

Published : Jun 17, 2021, 12:41 PM IST

Updated : Jun 17, 2021, 2:40 PM IST

अहमदनगर- आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी आज करण्याची वेळ अहमदनगर जिल्हातील अकोले येथील शिंदे कुटुबीयांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार उमलन्या आधीच कोमेजून गेलीये.

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उप प्राचार्य,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे काल कोरोनाचे उपचार घेत असतांना निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही करोना विरूद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय -लेकींच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. कोरोनाशी झुंज देत असतांनाच ती हे जग सोडून गेली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर महाविद्यालयातील केंद्रातुन सुकृताने गत वर्षी घवघवीत यश मिळविले होते. जागतिक महिला दिन असो की महिलांना कायदे विषयक जनजागृती पर लेखही तिचे प्रसिद्ध झाले होते. अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करू लागली होती. सुकृता हिने एम. ए.मराठी चे शिक्षण घेतले. ती शांत बसणारी मुलगी नव्हती. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली तिने डीएड अभ्यासक्रम ही पूर्ण केला होता. तिने डी एड ची पदविका संपादन केल्या नंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती. त्यामुळे तिने पत्रकारिता अभ्यासक्रम ही पूर्ण केला.

सुकृता हिचे लग्न जमले होते. मध्यंतरी साखरपुडा झाला होता. तिचे नियोजित पती व त्यांचे कुटुंब तिची काळजी घेत होते. रात्री तिची प्रकृती खालावली. तिच्यावर उपचार करणारे डॉ. तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. 4 मे 2021 या दिवशी तिचा विवाह ठरला होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागल्याने हा विवाह पुढे ढकलन्यात आला होता. अकोले येथील श्रीमंत मंगल कार्यालयही त्यासाठी बुक केले होते. मात्र, तिच्या हातावर मेहंदी लागन्याआधीच ती सर्वांना सोडून गेली.

Last Updated : Jun 17, 2021, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details