अहमदनगर- शिर्डी साईबाबांच्या भक्त निता अंबानी यांनी शिर्डीतील भक्तांसाठी 1 कोटी 17 लाख रुपयांचे संरक्षण साहित्य भेट दिले आहे. भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंबानी यांनी साई संस्थानाला ही भेट दिली आहे.
निता अंबानीकडून साई भक्तांसाठी 1 कोटीचे संरक्षण साहित्य भेट - गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत निता अंबानी यांनी साई चरणी आपली गुरु दक्षिणा अर्पित केली आहे.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत निता अंबानी यांनी साई चरणी आपली गुरु दक्षिणा अर्पित केली आहे. यामध्ये 45 लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, 5 लाख रुपयांचे 55 हँड डिटेकटर, आणि 15 लाख रुपयांचे 77 वॉकी-टॉकी, असे साहित्य खरेदी त्यांनी शिर्डीला पाठवले आहे.
गेल्या काही वर्षापासुन स्वतः खरेदी करण्याएवढे पैसे असतानही साई संस्थान या वस्तु भाडे तत्वावर वापरत होते. मात्र, आता अंबानीच्या या दानामुळे संस्थानला मोठा फायदा होणार आहे. अंबांनी यांनी दान रुपी पाठवलेल्या या वस्तु शिर्डीत आल्या असून त्यांची साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुळगीकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वस्तु साई मंदिरातील मुख्य गेट 1,2,3,4 येथे बसवण्यात आल्या असून त्याचा वापर सुरु आहे.