शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांमुळे जसे शिर्डीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच शिर्डी जवळील साकुरी प्रसिद्धीस पावली आहे, येथे असेलल्या ब्रम्ह्मचारी कन्यांच्या पुजेच्या अधिकारामुळे. विसाव्या शतकात साईबाबांचे समकालीन उपासणी महाराजांनी या ठिकाणी महीलांना पूजाकर्म आणि यज्ञ करण्याचा अधिकार दिला आहे. आज गणेश चतुर्थीला कन्यांद्वारे गणेशमूर्तीची स्थापना करत गणेश यज्ञाला सुरुवात झाली आहे.
स्थापनेबद्दल माहिती देतांना ज्येष्ठ कन्या हा आहे इतिहास
साकुरी येथील उपासनी महाराज हे विसाव्या शतकात महाराष्ट्रात एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. अध्यात्मिक तत्त्वावर साचलेली काजळी दूर करत साकुरीच्या स्मशानता ते राहीले आणि याच ठिकाणी साधारणत: सन 1933 च्या सुमारास त्यांनी कन्यांना वैदीक शिक्षण देण्यास सुरूवात करत येथील सर्व पुजा करण्याचा अधिकार कन्यांना दिला आहे. या मंदिरात वर्षभरात सात यज्ञ होतात. त्याची सुरुवात गणेश यज्ञाने केली जाते. आज गणेश चतुर्थीला या ब्रम्हचारी महीलांनी मंत्रो उपचाराच्या स्वरात गणेश मुर्तीची स्थापना केली. त्याचबरोबर यज्ञ मंडपात कन्यांच्याच हस्ते गणेश यज्ञाला सुरुवात झाली आहे. या यज्ञात दुर्वा, शमीच्या समीधा आणि दररोज 121 मोदकांची आहुती दिली जाते. शिवाय 121 वेळा गणेश आवर्तन अर्धवर्ष म्हटले जाते.
ब्रम्हचारी कन्यांकडून विधिवत होते पुजा
आज गणेश चतुर्थी असल्याने घरा घरात गणेश मूर्तीची स्थापना केली जात आहे. साकुरी गावातील अनेक लोक देखील आपल्या घरात गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी घेऊन येणारे गणेशमूर्ती सर्वात प्रथम उपासनी महाराज मंदिरात घेऊन येतात आणि या गणेश मूर्तींची ब्रम्हचारीं कन्यांकडून विधिवत पुजा करून या गणेश मुर्तीची स्थापना आपल्याला घरात करतात. याच मंदीराला लागून येथे एक शेवगाच्या शेंगाच झाड आहे. हा मंदीर परिसरात तसा विविध झाडांनी वेढलेला आहे. या शेवग्याच्या मध्यभागात गणेशाची प्रतिमा दिसु लागल्यानंतर त्याची पुजा आर्चा होवू लागली. शिर्डीला येणारे भाविक या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जुन साकुरीला येतात. कालांतराने झाड जीर्ण झाले. मात्र गणेशमूर्ती असलेला भाग खराब झालेला नव्हते. त्यामुळे तो झाड काढून एका चौथऱ्यावर त्याच ठिकाणी त्या झाडाचा गणेश असलेला मध्यभाग ठेवण्यात आला असून आता त्याला मंदीर बांधण्यात आले आहे.
हेही वाचा -Ganeshotsav 2021 : आजोबा गणपतीची प्रेरणा घेत लोकमान्य टिळकांनी सुरु केला सार्वजनिक गणेशोत्सव