अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एकजण नाशिक येथील कोरोनाबाधिताचा नातेवाईक आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एकजण निमोण येथील आहे. निमोण येथील व्यक्तीचा मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर सायंकाळी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
संगमनेरमध्ये आढळले कोरोनाचे नवे चार रुग्ण, एकाचा मृत्यू - संगमनेरमध्ये कोरोनाचे रुग्ण
संगमनेर तालुक्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एकजण नाशिक येथील कोरोनाबाधिताचा नातेवाईक आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एकजण निमोण येथील आहे. याशिवाय निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे कोरोनाबाधित आढळून आली आहे.
याशिवाय निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 66 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. मंगळवारी सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून 26 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तीनजण बाधित आढळून आले.
बाधित आढळलेली 57 वर्षीय महिला ही नाशिक येथील एका कोरोना रुग्णाची नातेवाईक आहे. दुसरा 52 वर्षीय रुग्ण हा संगमनेर शहरातील रहमतनगर येथील रहिवासी असल्याची माहिती डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. सध्या, नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील आहे. त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.