अहमदनगर-जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी ४२८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ६२० वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४८ झाली आहे.
अहमदनगरमध्ये ४२८ कोरोनाबाधित वाढले; रुग्णसंख्या २ हजार ६२० वर - अहमदनगर कोरोना केसेस लाईव्ह
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ६२० वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात एकूण ४८ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद बुधवारी झाली आहे. शासकीय लॅब, खाजगी लॅब आणि अँटिजेन चाचण्या मिळून तब्बल ४२८ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. जिल्हा शासकीय कोविड लॅबमध्ये २४ तासात ८४ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अँटीजेन चाचणीत ४४ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर खाजगी प्रयोग शाळेतील ३०० कोरोना बाधित रुग्णांची एकूण रुग्ण संख्येत नोंद आली आहे.
दिवसभरात ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात एकूण ४८ रुग्ण कोरोनामुळे दगावले असून मागील तीन दिवसात १० जणांचा मृत्यू झाला.