अहमदनगर:संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Four Boys Died in Sangamner) झाल्याची घटना घडलीय. शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिकेत आरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै आणि विराज अजित बर्डै अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावे आहेत. (Four boys died due to electric shock in Sangamner) (Latest News from Ahmednagar)
गावाजवळच्या तळ्यात आंघोळीला गेले अन् शॉक लागला; एकाच परिवारातील चार चिमुकल्यांचा मृत्यू - Four Boys Died in Sangamner
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Four Boys Died in Sangamner) झाल्याची घटना घडलीय. शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिकेत आरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै आणि विराज अजित बर्डै अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावे आहेत. (Four boys died due to electric shock in Sangamner) (Latest News from Ahmednagar)
गावकऱ्यांमध्ये हळहळ -याबाबत समजेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी अनिकेत आरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै, विराज अजित बर्डै हे चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारही लहाण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे, यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नंतर जनार्दन आहेर यांच्यासह नागरिकांनी या चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे.
मृतदेह झोळीतून आणले-पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. चारही मुलांच्या मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आई वडिलांनी हंबरडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.