महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Parab criticizes Shinde govt : प्रत्येकाचे दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवले पाहिजे; सत्ताधाऱ्यांना अनिल परब यांचा इशारा

उद्धव ठाकरे यांना याआधी सर्वच शासकीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्या जायचे. मात्र, आता त्यांना सामान्य आमदारासारखी वागणूक दिली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा अपमान करणारी ही गोष्ट असून सत्ता त्यांची आहेत त्यांना जसे वाटते तसे ते वागत आहेत. मात्र, प्रत्येकाचे दिवस बदलत असतात, हेही लक्षात ठेवले पाहीजे असा इशारा सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी शिर्डीत साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना दिला.

Anil Parab criticizes Shinde govt
सत्ताधाऱ्यांना अनिल परब यांचा इशारा

By

Published : Jan 19, 2023, 10:55 PM IST

माजी मंत्री अनिल परब यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

अहमदनगर :माजी मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी शिर्डीत येवुन साईबाबांच्या मध्यान आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. महाविकास आघाडीच्या वतीने पदवीधर मतदार संघाच्या जागा वाटप करण्यात आला होत्या. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसला जागा देण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे आम्हाला शुभांगी पाटील यांना पाठींबा द्यावा लागलाय. एखाद्या निवडणुकीत गणित इकडं तिकडे झाल्यामुळे आघाडी मध्ये बिघाडी होत नाही असेही परब म्हणाले आहे.


काय म्हणाले ?मी परिवहनमंत्री असतांना भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी बस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. त्यांना शासकीय कर्मचारी म्हणुन त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे. यासाठी 5 महिने यांनी महाराष्ट्रातील जनतेला विठीस धरले होते. आज एसटी कर्मचाऱ्यांना पगार देवून शकत नाही. सरकारने न्यायालयात अंडरटेकींग दिले आहे की, आम्ही बस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देवु शासन त्याचासाठी पैसे देईल. मात्र, अजुनही त्यावर काही होत नाहीय. कुठे गेले आता पडळकर आणि सदाभाऊ खोत आता का मूक गिळून बसले असल्याची टीका अनिल परब यांनी केलीय. आता बस कर्मचाऱ्यांच्या पगारावर कोणाची ही बोलण्याची मनस्थिती नाही. कारण त्यावेळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा स्टंट होता आणि आता तो स्टंट उघडा झाला आहे. पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना बस कर्मचाऱ्यांचा बाबतीत किती कळवळ हे उघड झाले आहे असेही परब यावेळी म्हणाले आहे.

हेही वाचा :PM Modi In Mumbai : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास -पंतप्रधान

ABOUT THE AUTHOR

...view details