अहमदनगर -सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पाराने उच्चांक गाठला आहे. अनेक तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्यासाठी वनवन भटकंती करत आहेत. त्यातच एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ आता समोर ( leopard cubs were watered ) आला आहे.
3 महिन्याच्या बछड्यांना पाजले पाणी - अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात, वन कर्मचारी अशोक घुले त्यांचे सहकारी जंगलात खड्डे खोदण्याचे काम करत असताना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आल्याने गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. कर्मचारी अशोक घुले यांची ही माहिती वन क्षेत्रपाल प्रदिप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका टोकरीत पाणी उपलब्ध करुन देत चक्क एका बिबट्याच्या बछड्याला बाटलीने पाणी पाजत असतांना संपूर्ण व्हिडिओ शुट झाला आहे.