महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोककलावंतांनाही कोरोनाची झळ; अहमदनगर पोलिसांनी धान्य देऊन केली मदत - ahmadnagar police folk artist help

शहर पोलीस विभागाचे उपअधीक्षक संदिप मिटके, तसेच घर घर लंगर स्वयंसेवी संघटनेच्यावतीने पोलीस मुख्यालयातील लॉनमध्ये गरजूंना अन्न, धान्याची किट देऊन त्यांची मदत करण्यात आली. यावेळी गरजूंनी मदतकर्त्यांचे आभार मानले.

अहमदनगर पोलीस लोककलावंत मदत
अहमदनगर पोलीस लोककलावंत मदत

By

Published : Sep 30, 2020, 4:18 PM IST

अहमदनगर- समाजाच्या सर्व वर्गातील नागरिकांना कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनची झळ बसली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत शहरातील पोलिसांनी व घर घर लंगर या सामाजिक संघटनेने सामाजिक जबाबदारीतून पोतराज, शाहीर, लोककलावंत व गरजूंना मदत केली आहे.

लोककलावंतांना धान्य देताना पोलीस

शहर पोलीस विभागाचे उपअधीक्षक संदिप मिटके, तसेच घर घर लंगर स्वयंसेवी संघटनेच्यावतीने पोलीस मुख्यालयातील लॉनमध्ये गरजूंना अन्न, धान्याची किट देऊन त्यांची मदत करण्यात आली. यावेळी गरजूंनी मदतकर्त्यांचे आभार मानले.

हेही वाचा-अहमदनगरमध्ये पोलीस निरीक्षकानेच केला महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details