शिर्डी- दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून दररोज 28 उड्डाणे होतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून या विमानतळावर विमाने उतरु शकली नाहीत. वातावरणातील दृश्यमानता कमी असल्याने विमाने उतरण्यात अडथळा निर्माण होत असल्याने तब्बल १४ विमाने रद्द झाली. विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी याबाबतची माहिती दिली.
साईनगरी शिर्डीतील विमानतळावर तीन दिवसांपासून विमानसेवा ठप्प; 14 उड्डाणे रद्द - शिर्डी विमानतळावरून विमानांची उड्डाणे रद्द
किमान अर्धा किलोमीटर दृश्यमानता असेल तरच विमान धावपट्टीवर उतरणे शक्य होते किंवा उड्डाण घेता येते. दृश्यमानता कमी असेल, तर विमान उतरविणे शक्य नसते.
शिर्डी विमानतळ परिसरात खराब हवामान असल्यामुळे शनिवारीही दिवसभरात येथून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही, तसेच विमानतळावर एकही विमान उतरविले गेले नाही. दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असल्याने हा त्रास होत असल्याच सांगण्यात येत आहे. किमान अर्धा किलोमीटर दृश्यमानता असेल तरच विमान धावपट्टीवर उतरणे शक्य होते किंवा उड्डाण घेता येते. दृश्यमानता कमी असेल, तर विमान उतरविणे शक्य नसते. येथील विमानतळावरून जाणारी विमाने रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.