अहमदनगर-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींपैकी चार आरोपी नाशिकचे आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायलयाने पुन्हा त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरण; पाच आरोपी ताब्यात - Gautam Hiran murder case news
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी तपासाठी वेगवेगळी चार पथके तैनात करण्यात आली होती. या प्रकरणी नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गौतम हिरण
पाच आरोपी ताब्यात
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक़ अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
Last Updated : Mar 13, 2021, 4:26 PM IST