अहमदनगर- देशभरात आज कोरोना लसीकरणाल सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आरोग्य केंद्र तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला होता.
जिल्ह्यात बारा केंद्रावर लसीकरण -
केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर ही मोहिम राबविण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. संरक्षण विभागाकरिताही 310 डोसेस देण्यात आले आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
अंगणवाडी सेविकेला लसीचा पहिला मान -