अहमदनगर- गेल्या १२ मार्चला कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला अहमदनगरमधील पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या रुग्णाचे १४ आणि पंधराव्या दिवशीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज या त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. घरी परतणाऱ्या या रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत निरोप दिला आहे.
अहमदनगरातील पहिला कोरोना रुग्ण झाला बरा...
आज घरी परतणाऱ्या या रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत घरी जाण्यास निरोप दिला. यावेळी त्याने आपले अनुभव सांगताना जनतेने प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
ही व्यक्ती १ मार्चला दुबईहून देशात परतला आणि १२ मार्च रोजी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. यानंतर त्याला नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या आले. उपचारानंतर आता हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, पुढील १४ दिवस त्याला होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. जिल्ह्यात एकूण ३ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यातील पहिला रुग्ण आता बरा झाला असून इतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज घरी परतणाऱ्या या रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत घरी जाण्यास निरोप दिला. यावेळी या त्याने आपले अनुभव सांगताना जनतेने प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.