महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; 5 पोलिसांना संसर्ग

जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस दलातील पहिला करोना बळी.. आतापर्यंत पाच पोलीस कर्मचारी कोरोना बाधित.. नगर शहरात करोनाने पोलिसाचा बळी घेतला आहे.

Ahmednagar Police
अहमदनगर पोलीस

By

Published : Jul 26, 2020, 11:26 AM IST

अहमदनगर-जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 55 वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. नगर जिल्ह्यात पोलिसाचा कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू ठरला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली होती. ते नगर शहरात वास्तव्यास होते. त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असताना गेल्या चार-पाच महिन्यांत कोरोना बंदोबस्तासाठी ते विविध ठिकाणी कोरोनायोद्धा म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला. सतत हसतमुख व सर्वांशी मिळून मिसळून राहणार्‍या या लोकप्रिय पोलीस अधिकार्‍याच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्यात पोलिसाचा कोरोनाने घेतलेला हा पहिला बळी तर नगर शहरातील चौदावा बळी ठरला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने 3 हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details