अहमदनगर - आज पहाटे भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. यात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा घटना का घडत आहेत, याबाबत काळजी घेण्याची गरज असून, घटनेची चौकशी होईल असे सांगत, सरकारी रुग्णालयात असा निष्काळजीपणा का झाला? असा प्रश्न माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केला.
भंडाऱ्यातील घटनेची चौकशी होईल; माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची माहिती - Praful Patel Shirdi
आज पहाटे भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. यात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा घटना का घडत आहेत, याबाबत काळजी घेण्याची गरज असून, घटनेची चौकशी होईल असे सांगत, सरकारी रुग्णालयात असा निष्काळजीपणा का झाला? असा प्रश्न माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केला.
आरोग्यमंत्र्यांनी ही घटना गांभीर्याने घ्यावी, अशी मी त्यांना विनंती केल्याची माहिती पटेल यांनी दिली. पटेल यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधत औरंगाबादच्या नावाचा संभाजी नगर असा उल्लेख शिवसेना आधीपासूनच करत असल्याचे सांगितले. मात्र, नाव बदलने हा शासनाचा विषय असतो. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होईल. तिन्ही पक्षांचा एक विचार होईल, कॉर्डिनेशन कमेटीमध्येही चर्चा होईल. त्यामुळे, या विषयावर आत्ताच फार बोलने योग्य ठरणार नाही, असे पटेल म्हणाले.