अहमदनगर- नगर-औरंगाबाद रस्त्यावर एन आर लॉन्स समोर एका गादीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये कारखान्यातील गाद्या पूर्ण जळून खाक झाल्या आहेत.
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गादी कारखाना भस्मसात - आगीत गादी कारखाना भस्मसात
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका गादी कारखान्याला आग लागली होती. यात कारखाना जळून भस्मसात झाला आहे.
आग लागल्यामुळे कारखान्यात असलेली गॅस टाकीचा स्फोट झाला. या कारखान्याच्या शेजारी राहत असलेल्या महिलांना आग लागल्याचे माहीत होताच दोन महिलांनी मुलांना घेऊन घराबाहेर धाव घेतली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही व सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी व महापालिकेतील अग्निशमन दलाच्या गाड्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्या व आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीमध्ये कारखान्याच्या आजूबाजूच्या चार ते पाच टपऱ्या होत्या त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार