महाराष्ट्र

maharashtra

राधाकृष्ण विखेंची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By

Published : Dec 30, 2019, 11:40 AM IST

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतचे वृत्‍त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

radhakrishana vikhe patil
राधाकृष्‍ण विखे पाटील

शिर्डी- माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतचे वृत्‍त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खोटी माहिती व्हायरल करणाऱ्याविरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष; प्रणिती शिंदेंची संधी दुसऱ्यांदा हुकली

राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याविरोधात काही वेबपोर्टल, ट्विटर, फेसबूक या सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट कोणताही पुरावा नसताना फक्त सूत्र या आशयाने व्हायरला केल्या जात होत्या. याबाबतची सत्‍यता जाणून घेतल्‍यानंतरच राधाकृष्‍ण विखे पाटील यांना केवळ बदनाम करण्‍यासाठी तसेच जनतेत त्यांची असलेली विश्‍वासार्हता कमी व्‍हावी, या उद्देशाने संबंधीत खोटी माहिती पसरवली जात होती.

दरम्यान, खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांची चौकशी करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी केली आहे. त्यानंतर सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांच्‍या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी २८ डिसेंबरला ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details