अहमदनगर : कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाने छापेमारी करून गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. फिरोज फारुख कुरेशी (वय ३७, रा.डॉ. आंबेडकर चौक, झेंडीगेट), आवेज फारुख कुरेशी (वय २१, रा.ब्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) जमील अब्दुल सय्यद (वय २८, रा.कोठला घासगल्ली), समीर अब्दुल सय्यद (वय २८, रा कोटला घासगल्ली अहमदनगर) रिजवान अय्युब कुरेशी (वय २३ वर्ष, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर) पाच जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २६९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), (क), ९ (अ) प्रमाणे ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे ३४० किलो वजनाचे गोमांस, पाच सत्तुर व पाच वजनकाटे असा एकूण ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन दिवसांत सहा ठिकाणी कारवाई : कोतवाली पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत गोमांसाची विक्री तसेच गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या सहा ठिकाणी कारवाई केली आहे. २४ जून रोजी पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. त्यानंतर झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ, व्यापारी मोहल्ला, हमालवाडा, कसाईगल्ली, अचानक चाळ रेल्वेस्टेशन या ठिकाणी कारवाई करण्यात आली. महिनाभरात दहा कारवाई करून १०,२१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.