अहमदनगर- शासनाने मुळा-प्रवरा वीज संस्था ताब्यात घेतल्यानंतर यंत्रणा वापरापोटी संस्थेला दिल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे नेमके काय झाले? या व्यवहारात पारदर्शकता नाही, असा आरोप अशोक विखे यांनी राधाकृष्ण आणि सुजय विखे यांच्यावर केला आहे. अशोक विखे हे राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
मुळा-प्रवरा वीजसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार; राधाकृष्ण विखेंवर ज्येष्ठ बंधू अशोक विखेंचा आरोप
डॉ. सुजय हे मुळा-प्रवरा वीज संस्थेचे अध्यक्ष आहेत. पण त्यांना ना वैद्यकीय अनुभव ना साखर कारखाना चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे संस्थेला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांबाबत कसलीही पारदर्शकता नाही. आपण याबाबत चौकशीची मागणी विविध एजन्सीकडे करत असल्याचे अशोक विखे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जाहीर प्रचाराची सांगता होत असताना त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आपण वडिलांप्रमाणे अन्यायाविरुद्ध लढत आहोत. मी सोडून कुटुंबातील इतर सर्वांची प्रवरा परिसरात दहशत आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे सांगतानाच आपण करत असलेल्या आरोपांमध्ये शरद पवार यांचा कुठलाही हात नसल्याचे अशोक विखे यांनी सांगितले. पवार-विखे कुटुंबाचे घरगुती स्नेहसंबंध होते. मात्र, राधाकृष्ण विखे यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कलह निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.