अहमदनगर- जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये वादंग निर्माण झाला. विशेष म्हणजे हे सर्व शिक्षक एकाच मंडळाचे होते. मात्र, त्यांच्या गुरुमाऊली मंडळात उभी फूट पडल्याने भर रस्त्यावरच हे शिक्षक एकमेकांना भिडले.
अहमदनगर : पदाधिकारी निवडीवरून प्राथमिक शिक्षक रस्त्यावरच भिडले - nagar
विद्यार्थ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण करण्याचे कर्तव्य असताना शिक्षकच भर रस्त्यावर हाणामारी करत असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
भररस्त्यावर संचालकाना दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार सुरू झाला. जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया आज होती. या निवडीपूर्वी बँकेचे संचालक हे सभागृह जात असतानाच त्यांना अनेक सदस्यांनी अटकाव केला. काही जण संचालकांनी आतमध्ये जाऊ नये, अशी भूमिका घेताना पाहायला मिळाले. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत रावसाहेब रोहकले यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या गुरुमाऊली मंडळात फूट पडली आणि यावरून संचालकांना ओढाओढीचा प्रकार सुरू झाला.
या गोंधळानंतर झालेल्या पदाधिकारी निवडणुकीत बंडखोर गटाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवडून आले. साहेबराव अनाप हे अध्यक्ष तर बाळासाहेब मुखेकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले. मात्र, विद्यार्थ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण करण्याचे कर्तव्य असताना शिक्षकच भर रस्त्यावर हाणामारी करत असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.