महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाडळी-चितळी परिसरात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण - पाडळी व चितळी बिबट्यामुळे भीतीचे वातावरण

पाडळी व चितळी गावांमध्ये तब्बल आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनक्षेत्र अधिकारी रात्रंदिवस गस्त घालत आहेत. तसेच ठिकठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.

अहमदनगर
अहमदनगर

By

Published : Nov 28, 2020, 10:22 PM IST

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील पाडळी व चितळी गावांमध्ये तब्बल आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनक्षेत्र अधिकारी रात्रंदिवस गस्त घालत आहेत. तसेच ठिकठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत. बिबट्याने अक्षरशः वनक्षेत्र अधिकारी व चितळी पाडळी परिसरातील ग्रामस्थांची झोप उडविली आहे.

दररोज वनक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत. या वेळेस एस. एम. पारधी, बिबट रिस्किट्यु संगमनेर डि.बी‌.गवारे,डि.पी.तोरंबे,ए.एल.पीसे, जे.डी.शिरसाठ,के.बी. दहिफळे, एम एम शेवंते, विष्णू मरकड, गणेश पाखरे ,बी.के. घोरपडे, उपवन संरक्षक श्री आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे.

कुठल्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करणार

यावेळी श्री पारधी म्हटले की, कुठल्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करणार आहोत. आतापर्यंत मढी, शिरापूर, घाटशिरस, करंजी, पाडळी, धारवाडी, धामणगाव, कुरणतांडा अशा विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत, असे दहिफळे यांनी सांगितले. यावेळी सामाजिक हितासाठी वनक्षेत्र अधिकारी यांनी लोकांना आवाहन केले की, एकटे शेतात जाउ नये, संध्याकाळी घराबाहेर पडू नये, लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.

ABOUT THE AUTHOR

...view details