अहमदनगर- मजुरीचे काम करणार्या पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील एमआयडीसी उपनगरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी बापाविरोधात अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी नराधम पित्यास केली अटक-
स्वत:च्या मुलीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर पित्याला अटक - परप्रातिय कुटुंबातील पित्याचा मुलीवर अत्याचार
अहमदनगर कामानिमित्त वास्तव्याला आलेल्या परप्रांतिय कुटुंबातील पित्याने पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नराधम पित्यास अटक करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री ही घटना घडली होती. हे कुटुंब परप्रांतीय असून नगरमध्ये कामासाठी आलेले आहे. आरोपीने राहत्या घरी स्वतःच्याच मुलीवर अत्याचार केला. पतीच्या या कृत्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नराधम पित्यास अटक केली असून न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे अधिक तपास करत आहेत.